factograf
MR

गिलगिट-बाल्टिस्तान मधील एक शहर

स्कर्दू

स्कर्दू

Key facts

लोकसंख्या१,१२,९९६
समुद्रसपाटीपासूनची उंची२,२२६m
प्रकारशहर
देशपाकिस्तान


स्कर्दू (उर्दू: سکردو‎; बाल्टी: སྐར་དོ) हे पाकव्याप्त काश्मीर भागाच्या गिलगिट-बाल्टिस्तान ह्या प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर बाल्टिस्तान भागात सिंधू व शिगर ह्या नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून ७,३१० फूट इतक्या उंचीवर वसले आहे. येथे काराकोरम व हिमालय ह्या पर्वतरांगा जुळतात. गिलगिट खालोखाल स्कर्दू हे ह्या भागातील एक प्रमुख पर्यटनकेंद्र असून ८००० मीटरहून अधिक उंचीवर असणारी सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी स्कर्दू हा महत्त्वाचा तळ आहे.

गिलगिटमधून धावणारा काराकोरम महामार्ग स्कर्दूला उर्वरित पाकिस्तानसोबत जोडतो. येथील स्कर्दू विमानतळावरून इस्लामाबादसाठी दैनंदिन विमानसेवा चालते.

बाह्य दुवे

विकिव्हॉयेज वरील स्कर्दू पर्यटन गाईड (इंग्रजी)

Read next

In 41 languages

Text from Wikipedia, CC BY-SA 4.0 · Source article